आज्जीबाई
खूप दिवस मला राहून राहून एका आज्जीबाईंची आठवण येत आहे .तसं पाहिलं तर गेली चार एक वर्षे रोजच या आज्जीबाई आठवत आहेत.... कारण चार वर्षांपासून घरातील सर्व कामे मी स्वतः करते .मग रोज भांडी घासायला लागले की आज्जी आठवतात . तर अशा या आज्जी पुण्यात आमच्या घरी भांडी घासायला यायच्या . साधारण साडेआठच्या सुमारास . त्या यायच्या सुमारास मी वाड्याच्या common धुणं भांडी करायच्या जागेत आमचं चार जणांचं धुणं धुवत असायची . वाड्यात पाणी पहाटे पाचला यायचं ते नऊच्या सुमारास जायचं .आमच्या पंधरा कुटुंबांच्या वाड्यात आम्ही चारजणी तरी धुणं घरीच धुवायचो .बाकी चारपाच घरांचं काम रेऊबाई करायच्या .तर या सामायिक मोरीत दोन नळ आणि दोन मोठ्या खरखरीत दगडांचे ओटे ,खास धुणं धुवायला होते .आमची प्रत्येकीची वेळ ठरलेली असायची ,आणि हो ओटा आणि नळ पण ठरलेलं असायचं . मी साधारण पाऊण तास धुणे धुवायच्या निमित्ताने पाण्यात अक्षरशः डुंबत असायची . मग समोरच्या केळकरांच्या घरातून कोणीतरी रोज आवाज देई ...संजूबाई बास आता ...मग पटापटा आवरुन वर घरात जाऊन पुढचं काम...आणि आवरुन सायकल मारत कॉलेजला...असा आखीव कार्यक्रम असे . या गडबडीत आज्जी या...