Posts

आज्जीबाई

 खूप दिवस मला राहून राहून एका आज्जीबाईंची आठवण येत आहे .तसं पाहिलं तर गेली चार एक वर्षे रोजच या आज्जीबाई आठवत आहेत.... कारण चार वर्षांपासून घरातील सर्व कामे मी स्वतः करते .मग रोज भांडी घासायला लागले की आज्जी आठवतात . तर अशा या आज्जी पुण्यात आमच्या घरी भांडी घासायला यायच्या . साधारण साडेआठच्या सुमारास . त्या यायच्या सुमारास मी वाड्याच्या common धुणं भांडी करायच्या जागेत आमचं चार जणांचं धुणं धुवत असायची . वाड्यात पाणी पहाटे पाचला यायचं ते नऊच्या सुमारास जायचं .आमच्या पंधरा कुटुंबांच्या वाड्यात आम्ही चारजणी तरी धुणं घरीच धुवायचो .बाकी चारपाच घरांचं काम रेऊबाई करायच्या .तर या सामायिक मोरीत दोन नळ आणि दोन मोठ्या खरखरीत दगडांचे ओटे ,खास धुणं धुवायला होते .आमची प्रत्येकीची वेळ ठरलेली असायची ,आणि हो ओटा आणि नळ पण ठरलेलं असायचं . मी साधारण पाऊण तास धुणे धुवायच्या निमित्ताने पाण्यात अक्षरशः डुंबत असायची . मग समोरच्या केळकरांच्या घरातून कोणीतरी रोज आवाज देई ...संजूबाई बास आता ...मग पटापटा आवरुन वर घरात जाऊन पुढचं काम...आणि आवरुन सायकल मारत कॉलेजला...असा आखीव कार्यक्रम असे . या गडबडीत आज्जी या...

नसती उठाठेव

हुतात्मा एक्स्प्रेस किंवा  intercity express  म्हणजे सोलापूरवासियांचे एक मोठ्ठे कुटुंब म्हणायला हरकत नाही .तसंच हा कट्टा पण आहे .दरवेळेस प्रवास करताना हमखास दहा पंधरा ओळखीची माणसं भेटतात . याशिवाय देवाने आपल्याला तोंड हे बोलायलाच किंवा बडबड करायलाच दिले आहे या माझ्या ठाम समजुतीने म्हणा किंवा गैरसमजुतीने म्हणा ,प्रवासात बोलून वाढवलेल्या ओळखीचे लोक...अशी सगळीच जनता आपलीच असते .थोडक्यात माझ्या नजरेतून ही जनता एक्स्प्रेस च आहे . असंच एकदा पुण्याहून सोलापूरला येताना ,माझ्या समोर एक त्रिकोणी कुटुंब बसलेलं होते .ते तिघेही अंगाने चांगलेच दणकट होते त्यामुळे त्या सीटवर अगदी कोंबून बसले होते .आईवडील आणि मुलगी असा लवाजमा होता .मुलगी शरीराने अगडबंब होती म्हणून कशीबशी माववून बसली होती .शरीराने मोठी असली तरी चेहऱ्यावरुन लहान वाटत होती.माझ्या नेहमीच्या सवयीने मी कोणकोण आहे आजूबाजूला हे बघितले आणि  मी माझ्या विणकामात गढून गेले . साहजिकच' हे काय करताय?' वगैरे विचारपूस झाल्यावर ,मी गरवारे महाविद्यालयातून शिक्षण घेतले आहे ,असं त्या कन्येला कळले . तिचे बालसुलभ मन ( आकाराशी विसंगत )जागे झाले ....

हौस

         आज सकाळी माझ्या नणदेने एक फोटो पाठवला आणि प्रकर्षाने मला माझ्या दिवंगत सासूबाईंची आठवण झाली .माझ्या सासूबाई म्हणजे माहेरच्या कुसुम गोडबोले .त्यांचे वडील डॉ .जनार्दन नारायण गोडबोले .सोलापूर इथे महापालिकेच्या दाराशा दवाखान्यात त्यांनी सेवा केली .माझ्या सासूबाई आजघडीला असत्या तर ब्याण्णव वर्षाच्या असत्या .अतिशय सुगरण बाई ...स्वयंपाकघर हे कार्यक्षेत्र...ते त्यांनी खूप निष्ठेने प्रेमाने ,आपुलकीने आणि न कंटाळता सांभाळले .त्यांच्या पाककौशल्याविषयी नंतर लिहिन .तूर्तास त्यांनी जपलेली हौस.. त्यांचा जन्म १९२७ सालचा...म्हणजे तसा जुना काळ ..त्या वेळच्या रितीप्रमाणे विवाह लवकरच झाला .विवाहानंतर सासरे आणि त्या रत्नागिरी इथे वास्तव्यास गेल्या .माझे सासरे श्री.रा.वें बापट हे रत्नागिरी येथील गोगटे महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले होते . आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांचे वास्तव्य महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल.देशपांडे यांची सासूरवाडी...ठाकूरांचे घर..समुद्र घरापासून अगदी जवळ. तिथे राहात असताना तिथल्या प्रथेप्रमाणे नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा सासूबाई करायच्...

अनाहूत भीती

                         ही गोष्ट आहे साधारण १९८५-८६ मधली .माझ्या आठ दहा महिन्याच्या मुलाला संध्याकाळच्या वेळेस मी आमच्या घराच्या दिंडी दरवाजात ,जिथे बसायला छान भक्कम असे मोठे कट्टे होते ,तिथे घेऊन बसत असे .रस्त्यावर तुरळक गर्दी असे .अगदी क्वचितच एखादे वाहन जात असे.पण जरा मोकळ्यावर असल्याने वेळ चांगला जात असे .तर या माझ्या रोजच्या दिनक्रमातील आणि माझ्या निरीक्षणातून प्रत्यक्ष घडलेली ही घटना .                         दारावरुन रोज एक तरुण मुलगी आणि तिचे वडील जात असत.वडील डोक्यावर आखूड कापलेले पांढरे  केस ,चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसणारी , त्या काळजीने वाकलेले शरीर, नजर अर्थातच खाली ,खांद्यावर एक शबनम बॅग ,एका हातात काळी छत्री , सैलसर फुलशर्ट आणि अगदी विसंगत अशी ढगळी पँट आणि पायात झिजलेल्या चपला .हे गृहस्थ माझ्या लक्षात राहिले ते त्यांच्या चालण्याच्या लकबीमुळे.प्रत्येक पाऊल टाकताना त्यांच्या गुडघ्याला बसणारा एक झटका ,वेळावणारे पाऊल आणि यामुळे हातातील छत्रीची होणा...

माझ्या नजरेतून

आज  father's day ...यानिमित्ताने माझे वडील कै .श्री .श.रा.गोडबोले यांना श्रद्धांजली म्हणून केलेले काव्य.. अतिशय गरीबीत वाढलेले माझे वडील... सदाशिव पेठेत दोन खोल्यांमध्ये रहाणारे सहाजण ,त्यांचे पितृछत्र लहानपणीच हरवलेले आणि म्हणूनच माझ्या आजीने भावे प्राथमिक शाळेत नोकरी करून मुलांना खूप कष्टाने वाढवले .पात्रता आणि योग्यता असूनही १९४८ च्या सुमारास वालचंद इंजिनिअरिंग महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे पहिले वर्ष करून.. मोठा मुलगा या नात्याने घरची जबाबदारी उचलण्यासाठी शिक्षण सोडून.. पुण्यात दारुगोळा कारखान्यात ,खडकी इथे नोकरी  पत्करलेले माझे वडील. त्यांचे आयुष्य खूप खडतर गेले पण ना कधी खंत ,ना कधी प्रतारणा किंवा ना कधी परिस्थितीचे भांडवल .अशा माझ्या पिताश्रींचे आयुष्य कवितेतून उलगडण्याचा प्रयत्न. सलाम.. सलाम तुम्हाला नाना  मनापासून सलाम । गरिबीची लाज  न बाळगणाऱ्या  वृत्तीला सलाम । अंगभर वस्त्र नसताना ठिगळ लावलेल्या  तुमच्या कपड्यांना ..सलाम । कधीतरीच गोडधोड अन्न मिळूनसुद्धा समाधान मानणाऱ्या  रसनेला..सलाम   गरिबीचे भांडवल न करता स्वाभिमानी तुमच्या  ...